ratan tata
ratan tata  
देश

Ratan Tata Birthday: आजीच्या दोन शब्दांनी बदलले रतन टाटांचे पूर्ण जीवन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आज रतन टाटा यांचा 83 वा जन्मदिवस. पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. रतन टाटा यांचे नाव सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. त्यांना वारशामध्ये टाटाचे नाव मिळाले होते, पण याठिकाणी पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी कौटुंबिक अडचणीशी झगडणाऱ्या रतन टाटा यांच्यासाठी त्यांच्या आजी आधार ठरल्या. 1948 मध्ये रतन टाटा केवळ 10 वर्षाचे होते तेव्हा वडील नवल आणि आई सोनू यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रतनजी टाटा यांची विधवा, नवजीबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं. याकाळात आजीने रतन टाटा आणि त्यांच्या भावाची काळजी घेतली. रतन टाटा आजीची एक शिकवण कधीच विसरु शकले नाहीत.

हिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

एका कार्यक्रमात रतन टाटा सांगतात की, मी आणि माझा भाऊ जसे मोठे होत होतो, तसं आम्हाला रॅगिंग आणि खासगी समस्यांना सामोरे जावे लागले. आमच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता, आजच्यासारखी ती त्यावेळी साधारण गोष्ट नव्हती. पण, माझ्या आजीने आमचे चांगल्यारितीने पालनपोषण केले. जेव्हा माझ्या आईने दुसरे लग्न केले तेव्हा, शाळेतील मुलं आमच्याबाबत उलटसुलट बोलायचे. त्यावेळी आजीने आम्हाला संयम ठेवण्यास सांगितलं होते, ही गोष्ट आजही माझ्यासोबत आहे. 

आजीचं म्हणणं ऐकून आम्ही त्या परिस्थितीबाबत संयम बाळगला. मला आठवतंय की दुसऱ्या महायुद्धानंतर आजीने आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत लंडनला घेऊन गेलं होतं. तेथे मी खूप काही शिकलो. आजी आम्हाला म्हणायची, 'हे करु नरा', 'या गोष्टीबाबत गप्प रहा'. आजीच्या या बोलण्यामुळे सर्वात वरती 'मर्यादा' असल्याचं आम्हाला कळालं, असं रतन टाटा म्हणाले होते. 

'आम्हाला 2 कोटी कोरोना डोस द्या, अन्यथा...'; आशियातील देशाने...

मला वॉयलिन शिकायचं होतं, वडिलांना वाटायचं मी पियानो शिकावं. मला अमेरिकेला शिकण्यासाठी जायचं होतं, त्यांनी यूकेला जाण्यासाठी आग्रह धरला. मला आर्किटेक्ट बनायचं होतं, वडील मला इंजिनियर करु पाहात होते. जर माझी आजी नसती तर अमेरिकेच्या कॉर्नेल यूनिव्हर्सिटीमध्ये मी जाऊ शकलो नसतो. त्यांच्यामुळेच मी जरी मेकॅनिकल इंजिनियरिंग करण्यासाठी तेथे दाखल झालो, तरी आर्किटेक्चरची डिग्री घेऊन बाहेर पडलो. वडील खूप नाराज होते, यासंबंधी त्यांच्याशी खूप भांडण झाले, पण मी माझ्या पायावर उभा होते. आजीने मला शिकवलं की बोलण्याची हिंमतही सौम्य आणि आदरपूर्वक असू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT